सुळे
सुळे गावाच्या उत्तरेला एक प्राचीन शिवलिंग व सिध्देश्वर महारांजाचे मंदिर आहे. हिच एक प्रसिध्द ओळख या गावची मानली जाते.
या गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना १९८४ साली झाली असुन लखाणी आणि सुळे मिळुन ग्रुप ग्रामपंचायत कार्यरत आहे. सुळे गावच्या सिध्देश्वर मंदिराच्याच नावावरुन या गावातील व परिसरातील मुला-मुलींच्या माध्यमिक शिक्षणासाठी डांग सेवा मंडळाचे ‘ सिद्धेश्वर माध्यमिक आश्रम शाळा ‘ कार्यरत आहे.सिध्देश्वर मंदिरात वर्षाभरातुन दोन वेळा यात्रोत्सव असतो. एक म्हणजे महाशिवरात्री आणि दुसऱयांदा म्हणजे होळीला या दोन दिवशी सिध्देश्वर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात.या मंदिराला भेट देण्यासाठी कळवण पासुन अभोणा,कनाशी,जयदर,सुळे,सिध्देश्वर असा प्रवास मार्ग आहे.सुळे गावात आदिवासींच्या संख्येत कोकणा व भिल्ल जमातीचे लोक रहीवास करीत आहेत.सुळे गावामध्दे आज सद्दस्थितीला शैक्षणिक, वैद्यकीय,व मुलभुत सुविधांचा विकास झालेला आहे.सुळे गावात पारंपारीक सण ‘डोंगऱ्यादेव’ हा सण साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजेच गावात सुख: शांती नांदावी हा आहे.डोंगऱ्यादेव या धार्मिक सणाला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे.हे धार्मिक व्रत प्रामुख्याने कोकणा, भिल्ल, कोळी, पावरा, मावची आदि जातीचे लोक करतात.डोंगर्यादेवाचे हे व्रत सामुदायिकपने पारपाडतात.साधरणपने १५ दिवसचालणारे हे व्रत आदिवासी अलिकडच्या काळात ८ दिवस पाळतात.



































